Hardik Pandya | ‘हार्दिकला सुपरस्टारप्रमाणे वागवणे थांबवा’, माजी अष्टपैलू खेळाडूची बीसीसीआयकडे मागणी

Hardik Pandya | भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याच्या खराब कामगिरीमुळे चांगलाच संतापला आहे. तो म्हणाला की, भारतीय क्रिकेटने हार्दिक पांड्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर अष्टपैलू खेळाडू म्हणून इतके प्राधान्य देऊ नये कारण भारतीय खेळाडू आयसीसी स्पर्धांमध्ये छाप पाडण्यात अपयशी ठरला आहे.

हार्दिक खराब फॉर्मशी झगडत आहे
हार्दिक पांड्या ( Hardik Pandya) आयपीएल 2024 मध्ये खराब फॉर्मशी झुंजत आहे. त्यामुळे जूनमध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषक संघातील त्याच्या समावेशावरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आयपीएलच्या चालू हंगामानंतर लगेचच अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये ही जागतिक स्पर्धा सुरू होणार आहे. त्यासाठी येत्या काही दिवसांत भारतीय संघाची घोषणा होऊ शकते आणि हार्दिक हा संघात स्थान मिळवण्याच्या दावेदारांपैकी एक आहे.

हार्दिकवर इरफान संतापला
इरफान अलीकडच्या काळात हार्दिकवर टीका करण्यापासून मागे हटला नाही आणि यावेळी त्याने भारतीय अष्टपैलू खेळाडूवर टीका केली. हार्दिक पांड्याबद्दल बोलताना इरफान म्हणाला, भारतीय क्रिकेटने त्याला किती प्राधान्य द्यायचे हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. हार्दिकला जेवढे प्राधान्य मिळते तेवढे त्याला देऊ नये कारण आजपर्यंत आपण त्याच्या उपस्थितीत विश्वचषक जिंकलेला नाही. जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही मुख्य अष्टपैलू आहात तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय स्तरावर अशी कामगिरी करावी लागेल. अष्टपैलू खेळाडूंचा विचार केला तर, हार्दिकने आंतरराष्ट्रीय स्तरावर छाप पाडलेली नाही. आम्ही फक्त त्याच्या क्षमतेचा विचार करतो.

हार्दिकला वर्षभर खेळण्याचा सल्ला
हार्दिकला सल्ला देताना पठाण म्हणाले की, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीमध्ये खूप फरक आहे आणि हार्दिकने स्पर्धा निवडण्याऐवजी वर्षभर खेळावे. इरफान म्हणाला, आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय कामगिरीमध्ये आमचा गोंधळ होत आहे. दोघांमध्ये खूप फरक आहे. सर्वप्रथम हार्दिकने वर्षभर खेळावे. तो चॉइसनुसार स्पर्धा खेळू शकत नाही. भारतीय क्रिकेटने हे थांबवायला हवे. कोणत्याही एका खेळाडूला प्राधान्य देणे थांबवा कारण जर तुम्ही असे केले तर तुम्ही मोठ्या स्पर्धा जिंकू शकणार नाही. ऑस्ट्रेलिया गेली अनेक वर्षे सांघिक खेळाला प्राधान्य देत आहे. कांगारू संघ कोणत्याही एका खेळाडूला सुपरस्टार बनवत नाही. त्यांच्या टीममध्ये फक्त एकच सुपरस्टार नाही तर सगळे सुपरस्टार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा