“वजनदार ने हल्के को…”; मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला अमृता फडणवीसांचे नाव न घेता प्रत्युत्तर

 मुंबई –  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी मुंबईत बीकेसीमध्ये (BKC)  घेतलेल्या जाहीर सभेत भाजपासह विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मनेसे अध्यक्ष राज ठाकरे (Leader of Opposition Devendra Fadnavis, Manes President Raj Thackeray) यांच्यावर निशाणा साधल्याचे दिसून आले. विविध मुद्य्यांवरून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. त्यांच्या या सभेनंतर  नुकतीच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची गोरेगावच्या नेस्को सेंटरमध्ये (Nesco Centre) सभा पार पडली. या सभेत फडणवीस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला खणखणीत प्रत्युत्तर दिले.

बाबरीच्या (Babri) मुद्द्यावरून तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या वजनाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले.  ते म्हणाले, आज माझे वजन 102 किलो आहे. बाबरीवेळी माझे वजन (Weight) 128 किलो होते. माझ्या पाठीत खंजीर खुपसून  तुम्ही माझे वजन कमी करू शकणार नाही.  तुमच्या सत्तेच्या ढाच्याला पाडून पुन्हा सत्तेत  येणार आहे.असं ते म्हणाले.

अयोध्येला (Ayodhya) गेलो तेव्हा मी नगरसेवक आणि वकील होतो, असे सांगत गोळ्या -लाठ्यांची पर्वा न करता अयोध्या आंदोलनात गेलो होतो. बाबरी पाडायला गेलो होतो. तुम्हाला मिर्ची का लागली, असा सवाल फडणवीस यांनी एका गाण्याचे बोल वापरत केला.

यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनीही याबाबत भाष्य केले आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट (Tweet) करत मुख्यमंत्र्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.