नाना पटोलेंच्या ‘हातात’ असेल तर त्यांनी आपली 42 मतं संभाजीराजेंना द्यावीत – संजय राऊत

कोल्हापूर – राज्यसभा निवडणुकीच्या उमेदवारीवरून संभाजीराजे छत्रपती (Sambhaji Raje Chhatrapati) यांनी पत्रकार परिषद घेत मोठा आरोप केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शब्द मोडला, असा दावा छत्रपती संभाजी राजे यांनी केला. पुढील स्थिती पाहता आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. पण ही माघार नाही, असं संभाजीराजे छत्रपती यांनी स्पष्ट केलं आहे.

संभाजीराजेंच्या या आरोपामुळे शिवसेना संभाजीराजे समर्थक आणि भाजपच्या निशाण्यावर आली आहे. राजेंनी माघार घेतल्यानंतर शिवसेनेवर टीका होऊ लागल्यानंतर आता शिवसेनेकडून खासदार संजय राऊत यांनी विरोधकांना कोल्हापूरमधून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सोबतच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचाही चांगलाच समाचार यावेळी घेतला.

नाना पटोलेंच्या हातात असेल, तर त्यांनी आपली ४२ मते संभाजीराजेंना द्यावीत, असा खोचक टोला लगावला. संभाजीराजे छत्रपती आणि आमचा विषय आहे, इतरांनी चोंबडेपणा करू नये, चंद्रकांत पाटील काही शिवाजी महाराजांचे वंशज नाहीत, असा जोरदार हल्लाबोल संजय राऊतांनी केला.