स्वातंत्र्यदिनापूर्वी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळला, दोन दहशतवाद्यांचा खात्मा, 3 जवान शहीद

राजौरी – स्वातंत्र्य दिनापूर्वी जम्मू-काश्मीरच्या राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी उरी हल्ल्याची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला, परंतु भारतीय सुरक्षा दलांनी त्यांचा हा डाव हाणून पाडला आहे. राजौरीमध्ये दोन दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर भारतीय लष्कराचे ऑपरेशन पूर्ण झाले आहे. तत्पूर्वी, दहशतवाद्यांनी राजौरी येथे 25 किमी अंतरावर असलेल्या लष्करी कंपनीच्या ऑपरेटिंग बेसवर आत्मघाती हल्ला केला, ज्याला भारतीय लष्कराने जोरदार प्रत्युत्तर दिले आणि दोन्ही दहशतवाद्यांना ठार केले.(Indian-army-operation-in-rajouri)

दहशतवाद्यांविरोधातील हे ऑपरेशन पूर्ण झाल्याचे भारतीय लष्कराने म्हटले आहे. दहशतवाद्यांविरोधातील कारवाईत भारतीय लष्कराचे तीन जवान शहीद झाले असून पाच जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. लष्कराने परिसराची नाकेबंदी केली आहे.

याआधी, जम्मूच्या एडीजीपीने माहिती दिली होती की राजौरीतील दारहाल भागातील परगलमध्ये लष्कराच्या कॅम्पमध्ये कोणीतरी घुसण्याचा प्रयत्न केला, दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला आणि दोन दहशतवादी ठार झाले. लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या एका जवानाला उपचारासाठी नेण्यात आले आहे. 16 कॉर्प्स कमांडर लेफ्टनंट जनरल मनजिंदर सिंग जमिनीवरील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहेत.