प्रभू श्रीरामाचं आणि हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर मी 14 वर्षेही शिक्षा भोगायला तयार – राणा

मुंबई – अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांना आज लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. रुग्णालयातून बाहेर पडताच नवनीत राणा यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला.

मी अशी कोणती चूक केली? प्रभू श्रीरामाचं नाव घेणं, हनुमंताचं नाव घेणं चूक असेल, तर 14 दिवस काय? मी 14 वर्ष शिक्षा भोगायला तयार आहे. 14 दिवसंच काय, 14 वर्ष जरी जेलमध्ये टाकलं तरी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही. असं त्या म्हणाल्या. महाविकास आघाडीत सत्तेचा गैरवापर होत असल्याची तक्रार पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांकडे दिल्लीत करणार असल्याचं नवनीत राणा यांनी सांगितलं आहे. तसेच, दिल्लीत जाऊन संजय राऊतांचीही तक्रार करणार आहे, असंही त्या म्हणाल्या.

नवनीत राणा पुढे म्हणाल्या, क्रुरपणे एका महिलेवर जी कारवाई झाली ती संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली. डॉक्टरांनी माझी तातडीने तपासणी होऊन उपचार होणं गरजेचं असल्याचं लिहून दिलं तरी उपचार देण्यात आले नाहीत. तुरुंगात माझं मानसिक शोषण झालं. आज मी डॉक्टरांना विनंती करून डिस्चार्ज घेतला आहे. अजूनही माझ्या बऱ्याच तपासण्या बाकी आहेत.