कमाल झाली : उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेचे चक्क एमआयएमने केले स्वागत

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली. हिंदुत्व (Hindutva), काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit), बाबरी (Babri), महागाई (Inflation), पाणीप्रश्न (Water Question)आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Uddhav Thackeray ) यांच्या भाषणातील काही मुद्यांचे स्वागत करतो असं एमआयएम प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात मुस्लिम द्वेष नाही अस म्हणले या वक्तव्याचे स्वागत करत असल्याच खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितले. तर भाजप प्रवक्त्याने प्रेषित पैगंबर बाबत केलेल्या विधानामुळे देशाची नाचक्की झाली. मात्र हे विधान भाजपने केले आहे. त्यामुळे भारत माफी मागणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली. ही भूमिका योग्य असून भूमिकेचे आम्ही समर्थन करत असल्याचे खासदार जलील यांनी सांगितले.

उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात बाबरीवर बरंच वेळ घातला. त्या घटनेला आता तीस वर्ष झाली. आता महाराष्ट्राच्या विकासाबाबत काय? त्यावर बोलले असते तर आम्हाला आनंद झाला असता. त्याच बरोबर शहराच्या पाणी प्रश्नावर बोलताना ठेकेदारावर कारवाई करण्याचे आदेश दिले असे त्यांनी सांगितले. मात्र या गोष्टींशी नागरिकांना घेणे देणे नाही पाणी कधी देणार ते सांगा. तुमच्या बोलण्यावरून पुढील तीन वर्ष तरी पाणी मिळणार नाही, असे दिसत असल्याचे खासदाप इम्तियाज जलील यांनी सांगितले.