‘त्या’ फोटोवरून चंद्रकांत खैरे संतापले; म्हणाले, हे चुकीचं आहे

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली. हिंदुत्व (Hindutva), काश्मिरी पंडित (Kashmiri Pandit), बाबरी (Babri), महागाई (Inflation), पाणीप्रश्न (Water Question)आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

उद्धव ठाकरेंच्या सभेतनंतर विरोधकांकडून त्यांना उत्तर दिले जात आहे. यासोबतच काही फोटो देखील व्हायरल केले जात असून यात शिवसेना नेते सभेसाठी पैसे वाटप Allocation of money for Shiv Sena leader meeting) करत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कालच्या उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या विराट सभेत पैसे देऊन लोकांना आणल्याचा आरोप भाजप आणि मनसेच्या वतीने करण्यात आला.

अमेय खोपकर आणि नितेश राणे यांनी एक फोटो शेअर केला. यात चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) पैसे वाटत असल्याचा दावा करण्यात आलाय. यावर स्वत: शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. तो फोटो जुना आहे. जुना फोटो शेअर करत आरोप लावणं चुकीचं आहे, असं खैरे म्हणालेत.