Income Tax Slabs : आयकर भरणाऱ्यांना दिलासा नाही, टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही

Budget 2024 Live Updates : देशभरात येत्या तीन महिन्यांत सार्वत्रिक निवडणुका होणार असून त्याआधीचा आजचा मोदी सरकारचा (Modi Govt) शेवटचा अर्थसंकल्प आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण हा अर्थसंकल्प लोकसभेत सादर करत आहेत. अंतरिम अर्थसंकल्प सादर करताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या अनेक यशांची गणना केली आहे.

कर रचनेत म्हणजे टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नसल्याची मोठी घोषणा सीतारमण यांनी केली. सध्या आयकर भरणाऱ्यांना कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही.रिटर्न फाईल करणाऱ्या करदात्यांची संख्या 2.4 टक्क्यांनी वाढली आहे. मी करदात्यांच्या पाठिंब्यासाठी त्यांचे आभार मानते. नव्या कररचनेत 7 लाखांपर्यंतचं उत्पन्न असणाऱ्या करदात्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. करपात्र उत्पन्नात ३ टक्क्यांची वाढ झाल्याचे देखील त्यांनी नमूद केले.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले की, अर्थसंकल्पात प्राप्तिकरात कोणताही बदल केलेला नाही. अनेक जुनी कर प्रकरणे सरकार परत घेणार असल्याचे त्या म्हणाल्या. गेल्या 10 वर्षांत करसंकलन दुपटीने वाढल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितले. अर्थमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की, अर्थसंकल्पीय अंदाजाच्या 5.9 टक्क्यांच्या तुलनेत महसुली तुटीचे लक्ष्य 5.8 टक्के ठेवण्यात आले आहे.निर्यात शुल्कासह प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष करांसाठी पूर्वीचे कर दर कायम ठेवण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी ठेवला आहे.

महत्वाच्या बातम्या-

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत १०१ केंद्रांचा होणार शुभारंभ

व्हिजन पुणे शिखर परिषदेला उत्तम प्रतिसाद; विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी लावली हजेरी

अजितदादांची तिरकी चाल; ‘या’ नेत्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी