LokSabha Election 2024 | ८ लोकसभा मतदारसंघांतील ९५ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले

लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Election 2024) दुसऱ्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या कालच्या अखेरच्या दिवशी राज्यातल्या ८ लोकसभा मतदारसंघांतील एकंदर ९५ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतले. त्यामुळे आता २०४ उमेदवार रिंगणात आहे. अमरावतीमध्ये ३७, परभणीत ३४, हिंगोलीत ३३, वर्ध्यात २४, नांदेडमधे २३, बुलडाण्यात २१, यवतमाळ-वाशिममध्ये १७ आणि अकोल्यात १५ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.

यवतमाळ वाशिम मतदारसंघातील 3 उमेदवारांनी काल अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता 17 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. नांदेड लोकसभा (LokSabha Election 2024) मतदारसंघात ४२ उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे २३ उमेदवार निवडणूक लढवत आहेत.अकोला मतदार संघातून भाजपाचे माजी आमदार नारायण गव्हाणकर यांनी माघार घेतल्यानं भाजपा उमेदवार अनुप धोत्रे यांना दिलासा मिळाला आहे.

हिंगोली मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार घोषित झाल्याने नाराज झालेल्या तीन पदाधिकाऱ्यांनी बंडाचं निशाण फडकावत अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला होता. त्यात भाजपाचे रामदास पाटील, शाम भारती महाराज यांचा समावेश होता. मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, आमदार श्रीकांत भारतीय यांच्या शिष्टमंडळानं या बंडखोरांची भेट घेतल्यानंतर दोघांनी काल अर्ज मागे घेतले. भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष शिवाजी जाधव यांनी मात्र अर्ज कायम ठेवला आहे. दुसऱ्या टप्प्यात येत्या २६ तारखेला मतदान होणार आहे. या ८ लोकसभा मतदारसंघात १ कोटी ४९ लाख २५ हजार ९१२ मतदार आहेत. आणि १६ हजार ५८९ मतदान केंद्र आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | सहाही विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घेणार, पुणेकर माझ्या पाठीशी; मुरलीअण्णांनी व्यक्त केला विश्वास

Sunetra Pawar | अजितदादा ज्यावेळी एखादी भूमिका घेतात, त्यावेळी…; सुनेत्रा पवारांकडून अजितदादांचे कौतुक

Murlidhar Mohol | त्यांना निधी मिळाला, मला जनतेचे प्रेम मिळतेय; मुरलीधर मोहोळ यांचा धंगेकरांना टोला