अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात सौरभ महाकाळ याची चौकशी सुरू

पुणे – पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला (Punjabi singer Sidhu Musewala) यांच्या हत्या प्रकरणामुळे अवघ्या देशभरात एकच खळबळ उडाली आहे. यातच आता या प्रकरणातील दोन आरोपी (Accused) पुण्याचे असल्याची माहिती समोर आल्याने एकच खळबळ उडाली होती. आरोपी संतोष जाधव, सौरव महाकाल (Accused Santosh Jadhav, Sourav Mahakal) या दोघांचं पुणे कनेक्शन असल्याचं समोर आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

दरम्यान, आता या प्रकरणातील आरोपी सौरभ महाकाल याला पुणे ग्रामीण पोलिसांनी (Pune Rural Police) नारायणगाव मधून अटक केली आहे. जेव्हापासून सौरभचे नाव या प्रकरणात आले होते तेव्हा पासून पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर पोलिसांना त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळाले . यानंतर आता अभिनेता सलमान खान धमकी प्रकरणात सौरभ महाकाळ कांबळे याची चौकशी सुरू आहे.

सौरभ हा बिष्णोई टोळीचा सदस्य असल्याचे सांगितले जात आहे. मुंबई पोलीस उपायुक्त संग्रामसिंह निशाणदार (Sangram Singh Nishandar), पुणे ग्रामीण पोलीसचे अप्पर अधीक्षक मितेश गट्टे (Mitesh Gatte) यांच्याकडून त्याची चौकशी सुरू आहे. सौरभला ग्रामीण पोलिसांनी मोक्कामध्ये अटक केली असून न्यायालयाने 20 जून पर्यत पोलीस कोठडी सुनावली आहे.