IPL 2024 Schedule: आयपीएल २०२४ चे वेळापत्रक जाहीर, सीएसके विरुद्ध आरसीबी संघात रंगणार पहिला सामना

IPL 2024 Schedule : इंडियन प्रीमियर लीग (IPL 2024) च्या 17 व्या हंगामाचे वेळापत्रक गुरुवारी (22 फेब्रुवारी) जाहीर करण्यात आले आहे. गतविजेता चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघ पहिल्या सामन्यात खेळणार आहे. हा सामना 22 मार्च रोजी त्याच्या घरच्या मैदानावर एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. चेन्नईचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी (RCB) होणार आहे. आयपीएलच्या 21 सामन्यांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर झाले आहे. चेन्नईचा संघ विक्रमी नवव्यांदा आयपीएलच्या कोणत्याही मोसमातील पहिला सामना खेळणार आहे. यापूर्वी, संघाने 2009, 2011, 2012, 2018, 2019, 2020, 2022 आणि 2023 मध्ये उद्घाटन सामना खेळला आहे.

दिल्ली कॅपिटल्सचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. महिला प्रीमियर लीगचा अंतिम सामना दिल्लीत खेळवला जाईल, त्यानंतर लगेचच आयपीएलसाठी मैदान तयार करण्यास वेळ लागेल. त्यामुळे दिल्लीचे पहिले दोन सामने विशाखापट्टणम येथे होणार आहेत. देशात यावर्षी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांमुळे आयपीएलचे पूर्ण वेळापत्रक जाहीर झालेले नाही. आता फक्त 17 दिवसांचे वेळापत्रक समोर आले आहे. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर उर्वरित सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले जाईल.

पहिल्या आठवड्यात दोन डबल हेडर
“दोन आठवड्यांच्या कालावधीत 10 शहरांमध्ये 21 सामने खेळले जातील, प्रत्येक संघ किमान तीन सामने आणि जास्तीत जास्त पाच सामने खेळेल,” असे बीसीसीआयने आपल्या प्रसिद्धीपत्रकात लिहिले आहे. पहिल्या आठवड्यात दोन डबलहेडर असतील, ज्याची सुरुवात शनिवारी दुपारी दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्यासह होईल, त्यानंतर संध्याकाळी कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबादचा सामन होईल. घरचा संघ राजस्थान रॉयल्सचा सामना रविवारी दुपारी (24 मार्च) जयपूरमध्ये लखनऊ सुपर जायंट्सशी होणार आहे. घरचा संघ गुजरात टायटन्सचा सामना रविवारी संध्याकाळी पाच वेळा विजेत्या मुंबई इंडियन्सशी होणार आहे.

बोर्डाने म्हटले आहे की, “भारतातील आगामी लोकसभा निवडणुकांशी संबंधित सर्व आवश्यक प्रोटोकॉल आणि सल्ल्यांचे पालन करून बीसीसीआय सरकार आणि सुरक्षा एजन्सीसोबत जवळून काम करेल. 18व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर, बोर्ड पहिल्या दोन आठवड्यांच्या वेळापत्रकाशी संबंधित कोणत्याही समस्यांचे पुनरावलोकन करेल आणि निराकरण करेल. यानंतर बीसीसीआय मतदानाच्या तारखा लक्षात घेऊन उर्वरित हंगामासाठी वेळापत्रक निश्चित करण्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांसोबत काम करेल.”

महत्वाच्या बातम्या :

मनोज जरांगे हेकेखोर, त्याला काडीची अक्कल नाही; जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप

‘व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!’

Maratha Reservation ने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध! भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन