अजब योगायोग! संगीतकाराच्या पाचही पत्नीही एकाचवेळी राहिल्या गर्भवती; एकत्र 5 मुलांचा बाप होणार musician

Musician Zeddy Will Five Wives Baby Shower: याला चमत्कार म्हणा किंवा योगायोग म्हणा, एका पुरुषाच्या पाचही बायका एकाच वेळी गर्भवती झाल्या. पाचही सावत्र आई आहेत, पण बहिणींप्रमाणे एकत्र राहतात. आता या पाचही जणींनी एकाच दिवशी बेबी शॉवरचे आयोजन केले आहे, ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

त्याच वेळी, या 5 सुंदरींचा पती 22 वर्षीय जेडी विल एकत्र 5 मुलांचा बाप झाल्याच्या आनंदाने फुलला आहे. प्रसूतीच्या वेळी पाचही पत्नींना कसे सांभाळणार, याचीही त्याला चिंता आहे. एकाच वेळी 5 मुलांना कसे हाताळायचे आणि जर एखादीला जुळी मुले असतील तर काय करावे?

न्यूयॉर्कचा प्रसिद्ध संगीतकार जेडी विल

न्यूयॉर्क पोस्टच्या वृत्तानुसार, न्यूयॉर्कमध्ये राहणारे 22 वर्षीय संगीतकार जेडी विल यांनी 5 किंवा त्याहून अधिक मुलांचा बाप झाल्याचा आनंद साजरा करण्यासाठी आपल्या पत्नींसाठी बेबी शॉवर आणि पार्टीचे आयोजन केले होते. अॅशले, बोनी बी, जेलीन व्हिला, के मेरी, इयानला कलिफा गॅलेटी अशी जेडीच्या पाच पत्नींची नावे आहेत. 14 जानेवारी रोजी क्वीन्समध्ये एक पार्टी आयोजित करण्यात आली होती, ज्याचे आमंत्रण पत्र ऍशलेने पाहुण्यांना पाठवले होते.

ऍशलीनेच टिकटॉक आणि इंस्टाग्रामवर व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. जेडीच्या पाच पत्नींनीही कौटुंबिक फोटोसाठी पोझ दिली आणि तो इंस्टाग्रामवर पोस्ट केल्यावर कॅप्शन दिले – वेलकम लिटल जेडी विल्स 1-5. संगीतकाराच्या या पोस्टवर चाहते मजेशीर प्रतिक्रिया नोंदवत आहेत.

महत्वाच्या बातम्या-

मंदिर नको तर रोटी, कपडा, मकान, शिक्षण आणि आरोग्य हवंय; नक्षलवाद्यांची कोल्हेकुई झाली सुरु

Ram Mandir Pran Pratishta : राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळा थांबवला जाणार?

Women’s Health: 50 व्या वर्षी निरोगी राहू इच्छिता? रोज ही एक गोष्ट खायला सुरुवात करा