जयदत्त क्षीरसागर यांची ठाकरे गटातून हकालपट्टी; बीडच्या राजकारणात खळबळ

बीड – माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर (Jaydutt Kshirsagar) यांना ठाकरे गटाच्या शिवसेनेतून बेदखल करण्यात आलं आहे. बीड जिल्ह्यात शिवसेनेचे ( shivsena) काम करत असताना जयदत्त क्षीरसागर हे कुठल्याही कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांचा फोटो लावत नाहीत. क्षीरसागर यांनी मुंबईत जाऊन उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांची कधी भेट घेतली नाही. नुकताच एक उद्घाटनाचा कार्यक्रम झाला. त्यात उद्धव ठाकरे यांचा फोटो नव्हता आणि त्यांच्या नावाचाही उल्लेख केला नाही. त्यामुळे जयदत्त क्षीरसागर यांचा आजपासून शिवसेनेची काही संबंध राहणार नाही, अशी घोषणा जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि शिवसेनेचा (उद्धव ठाकरे गट) यांचा कसलाही संबंध नाही. आता यापुढे आम्ही स्वतंत्र निवडणूका लढणार नाही, अशी भूमिका संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी घेतली. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतल्याचे जगताप यांनी सांगितले.

या सर्व प्रकाराची माहिती संपर्क प्रमुख धोंडू पाटील आणि जिल्हा प्रमुख अनिल जगताप यांनी उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर जावून कळवली. यावर त्यांनी क्षीरसागरांचा पक्षाशी काहीही संबंध ठेवू नका, असे आदेश बीड शिवसेनेला दिले. त्याप्रमाणे जिल्हाप्रमुख अनिल जगताप यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली.