Jayant Patil | कुणी गेले तरे फरक पडणार नाही, कारण शरद पवार साहेब नावाचे विद्यापीठच

Jayant Patil | आता अनेकजण पक्ष सोडून गेले. कुणी गेले तरे फरक पडणार नाही, कारण शरद पवार साहेब नावाचे विद्यापीठच आपल्याकडे आहे. त्यांनी अशा अनेक प्रसंगांना ते सामोरे गेले आहे. माझ्या शाळेचा हेडमास्तर खमक्या आहे. आता नव्या पिढीला उभे करण्याचे काम पवार साहेब करतील. त्यांनी १९९९ मध्ये अर्थमंत्री केले. आर. आर. पाटील, अनिल देशमुख यांच्यासारख्या अनेकांना संधी दिली. आजही त्याच मूडमध्ये पवार साहेब आहेत. लोकसभा निवडणुकीत पवारांना बारामतीतच अडकवून ठेवण्याची इच्छा दिल्लीश्वारांची होती. त्यांनी सुप्रिया सुळेंचा पराजय करण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडले. मात्र निवडणुकीत राज्यात फिरणार नाहीत, ते पवार साहेब कसले. संपूर्ण निवडणुकीत राज्यात शरद पवार साहेबांची लाट दिसून आली. त्यातूनच १० पैकी ८ जागा निवडून आल्या आहेत असा हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी पक्षाच्या वर्धापन दिनानिमित्त अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) येथील आयोजित कार्यक्रमातून केला आहे.

लोकसभेमध्ये सर्वात पहिला प्रश्न दुधाच्या भावासाठी मांडण्यात येईल. राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्न लोकसभेमध्ये आम्ही सर्व खासदार मांडू. कांदा प्रश्नावर मी पियुष गोयल यांना म्हटले होते की कांद्याबाबत आपण काय करणार परंतु ते म्हणाले होते की, तीन जिल्ह्यासाठी मी देशाला वेठीस धरणार नाही त्याच तीन जिल्ह्याने कांदा प्रश्नावरून मंत्र्यांचा पराभव केला. असे सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.

मी राजकारणा व्यतिरिक्त अनेक क्षेत्रात काम करतो. पण, जेव्हा मला अडचण येते, भोवताली अंधार वाटतो, तेव्हा मी शरद पवार साहेबांचा चेहरा आठवतो आणि मला एक वेगळी उर्जा मिळते. लोकसभेला महाविकास आघाडीचा जो विजय झाला, तो इथं बसलेल्या प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांमुळं आणि शरद पवार साहेबांमुळे झाला आहे. आपले दहापैकी आठ खासदार आपले निवडून आले. तर दोघे जिद्दीने लढले. मात्र त्यांना पराभवाला सामोरे जावं लागलं. आपला स्टाईक रेट ८ चा आहे. तर नकली राष्ट्रवादीचा स्टाईट रेट २५ टक्के आहे आणि भाजपचा स्टराईक रेट ३४ टक्के आहे. पलीकडे पैसा, सत्ता, दबावतंत्र होतं, तरीही लोकांनी त्यांना नाकारून आपल्याला पंसती दिली. हे लोकसभेचं यश मस्तकातं गेलं नाही पाहिजे. कारण, आता आपल्याला लोकांच्या हिताासाठी विधानसभाही लढायची आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा आमदार रोहित पवार म्हणाले.

मी साहेबांना शब्द देतो नगर जिल्ह्यातील १२ च्या १२ जागी आम्ही जिंकणार. निलेश लंके जे बोलतो ते करतोच. सर्वांना माहिती आहे मी कसला पहिलवान आहे. संसदेत जर शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाहीतर संसेद बंद पाडेल. असे अहमदनगरचे खासदार निलेश लंके यांनी म्हटले आहे.

यावेळी अहमदनगर (अहिल्यादेवी नगर) शहरात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा २५ व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष तथा खासदार सुप्रियाताई सुळे, पक्षाचे ज्येष्ठ नेते जितेंद्र आव्हाड, शिरूरचे खासदार अमोल कोल्हे, कर्जत- जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यासह मोठ्या संख्यने राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थितीत होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकसभा निवडणुकीमध्ये विजयी झालेल्या सर्व खासदारांचा सत्कार करण्यात आला कार्यक्रमाला मोठ्या संख्येने राज्यातील पदाधिकारी तथा कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप