‘झंडुबाम घेऊन ठेवा, शिवसेना-संभाजी ब्रिगेड युती तुमची झोप उडवल्याशिवाय राहणार नाही’

Pune – शिवसेना (shivsena) आणि संभाजी ब्रिगेडनं (sambhaji brigade) राज्यातील आगामी सर्व निवडणुका एकत्रित लढवण्याची काल घोषणा केली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष मनोज आखरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray and Sambhaji Brigade president Manoj Akhre) यांनी मुंबईत पत्रकारांना ही माहिती दिली. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित मेळावे देखील घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. ही वैचारिक युती असल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या एकत्र येण्यानं एक चांगलं समीकरण तयार होईल, अशी आशा आखरे यांनी व्यक्त केली.

दरम्यान, हिंदुत्व विरोधी संघटनेशी हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाने युती केल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं जातंय. दरम्यान, शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) युतीमुळे भाजपची झोप उडाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी दिलाय. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडची युती झाल्यामुळे चंद्रशेखर बावन्नकुळे यांना पोटशुळ उठलाय, अशी खोचक टीकाही शिंदे यांनी केलीय.

संभाजी ब्रिगेडचे प्रदेश संघटक संतोष शिंदे म्हणाले, शिवसेना आणि आमच्या पक्षाची युती झाल्यामुळे भाजपची (BJP) झोप उडाली आहे. चंद्रशेखर बावन्नकुळेंना (Chandrasekhar Bavannakule) यामुळे का पोटशुळ उठलाय? संभाजी ब्रिगेडची एवढी भीती वाटते का? एक लक्षात ठेवा, आताच झंडू बाम घेून ठेवा, कारण तुमची अजून झोप उडाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा शिंदे यांनी केलाय.