इस्लाम हा धर्मच नसल्याचा कालिचरण महाराजांचा दावा; नवा वाद निर्माण होण्याची चिन्हे 

नाशिक – वारंवार वादग्रस्त वक्तव्य केल्याने चार्चेत येणारे कालीचरण महाराज(kalicharan maharaj)  आता पुन्हा एकदा त्यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. कालीचरण महारज यांनी  इस्लाम (islam) धर्माबाबत वादग्रस्त विधान केले आहे. कालीचरण महाराज नाशिक (Nasik) दौऱ्यावर असतांना त्यांनी ‘इस्लाम धर्मच नाही’ असे वक्तव्य केले आहे. त्यामुळे पुन्हा एकदा वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

यावेळी इस्लाम धर्माविषयी बोलताना ते म्हणाले कि, ‘इस्लाम हा धर्मच नाही..हा वाद धर्म विरुद्ध अधर्म आहे’, हिंदूंना (Hindu) जर कुटुंबासह धर्माचं संरक्षण पाहिजे तर हिरीरीने राजकारणात लक्ष द्यायला हवं. मुस्लिमांचे 100 टक्के मतदान हे फक्त इस्लामसाठी होतं. जर आई-बहिणींना वाचवायच असेल तर ते फक्त राजनीतीनेच वाचविता येऊ शकतं. म्हणून मी मोदींच्या कामावर प्रसन्न आहे, जो हिंदू हिताची गोष्ट करेल त्याला जाहीर पाठिंबा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

पुढे बोलताना ते म्हणाले कि, हिंदूंची पाच लाख प्रार्थना स्थळे फोडण्यात आली आहेत. ती परत मिळवणे गरजेचे आहे. यासाठी मोदी, शहा, योगी (Modi, Shah, Yogi) देशाला तारतील, असेही ते म्हणाले. राज ठाकरेंच्या (Raj thackeray)  भूमिकेवर स्पष्टीकरण देताना म्हणाले कि, हिंदुत्वासाठी जे काही होईल त्याचा सन्मानचं करण्यात येईल. तसेच शरद पवारांचे वैयक्तिक आयुष्य आहे. पण सोशल मीडियामुळे सर्वच जण बघत आहेत, असं ते म्हणाले.