Team Indiaच्या प्लेइंग इलेव्हनचे मोठे अपडेट, ‘हा’ खेळाडू रोहित शर्मासोबत सलामीला उतरणार

IND vs PAK: भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यातील सामना सुरू होण्यासाठी 24 तासांपेक्षा कमी वेळ शिल्लक आहे. आशिया चषक 2023 मध्ये भारत आणि पाकिस्तानचे संघ उद्या, शनिवार, 2 सप्टेंबर रोजी आमनेसामने येणार आहेत. हा शानदार सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पाकिस्तान विरुद्ध टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हन (Team India Playing Xi) संदर्भात एक मोठा अपडेट समोर आला आहे.

इंडियन एक्सप्रेसच्या वृत्तानुसार, पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मासोबत (Rohit Sharma) शुभमन गिल डावाची सुरुवात करेल. तर विराट कोहली तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल. यष्टिरक्षक फलंदाज इशान किशन मधल्या फळीत खेळेल असेही अहवालात म्हटले आहे.

महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की किंग कोहली 2023 आशिया कपमध्ये चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो. इशान किशन डावाची सुरुवात करू शकतो. मात्र, आता सामन्यापूर्वीच भारताची प्लेइंग इलेव्हन आणि फलंदाजीचा क्रम जवळपास स्पष्ट झाला आहे.

संजू सॅमसन 2023 आशिया कपसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून टीम इंडियासोबत आहे. मात्र, तो पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असणार नाही. वास्तविक, केएल राहुल पहिल्या दोन सामन्यांमधून बाहेर आहे. यामुळे इशान किशन पहिल्या दोन सामन्यांमध्ये विकेटकीपिंग करेल आणि मधल्या फळीत फलंदाजी करेल. संजू सॅमसनला संधी मिळणार नसल्याचेही या अहवालात स्पष्ट झाले आहे.

भारताची संभाव्य प्लेइंग इलेव्हन – इशान किशन (यष्टीरक्षक), शुभमन गिल, विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.