कानडी जनतेने ठाकरे गटाला दाखवला इंगा; पहा नेमकं काय केलं ?

Karnatka – कर्नाटक विधानसभेच्या 224 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसला 135 जागांसह स्पष्ट बहुमत मिळालं आहे. भाजपाला 66 तर धर्मनिरपेक्ष जनता दलाला 19 जागा मिळाल्या. काँग्रेस विधीमंडळ गटाची नवा नेता निवडीसाठी आज संध्याकाळी बेंगलुरु इथं बैठक आयोजित करण्यात आली आहे. सन 2018 च्या तुलनेत काँग्रेसच्या मतदार टक्केवारीत सुमारे पाच टक्क्यांनी वाढ होऊन ती 43 टक्के झाली. तर भाजपाची टक्केवारी किरकोळ घसरुन 36 टक्के राहिली.

या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे (Thackeray Group) तीन उमेदवारही निवडणुकीच्या रिंगणात उभे होते. महत्त्वाचं म्हणजे या तिन्ही उमेदवारांना आपलं डिपॉझिट (Deposit) राखता आलं नाही. उद्धव ठाकरे गटाने रोण, विजापूर आणि खानापूर मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले होते. या तिन्ही उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आहेत. त्यापैकी दोन उमेदवारांना 200 मतंही मिळवता आली नाहीत.

विजापूर शहर मतदारसंघातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार सतीश पाटील यांना अवघे 149 मते मिळाली. दक्षिण कर्नाटकतल्या गदग जिल्ह्यातील रोण या मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार कुमार अंदप्पा हकारी यांना 122 मते मिळाती.  तर सर्वाधिक 983 मते बेळगाव जिल्ह्यातील खानापूर मतदारसंघामधील कृष्णाजी पाटील यांना मिळाली. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.