धनुष्यबाण गोठवल्यानंतर ठाकरे गटाकडून ‘या’ ३ निवडणूक चिन्हांचे पर्याय सादर, पार्टीचे नावही पाठवले

मुंबई – शिवसेनेचे ‘धनुष्यबाण’ हे (Bow & Arrow) निवडणूक चिन्ह गोठवण्याचा आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी रात्री उशिरा जारी केला. या आदेशामुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackrey) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटांना अंधेरी-पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत (Andheri Bypoll Election) शिवसेनेच्या चिन्हाचा वापर करता येणार नाही. तसेच दोन्ही गटांना शिवसेना हे नावही वापरता येणार नाही.

यानंतर दोन्ही गटांनी पक्षाचे नवे नाव आणि नवे निवडणूक चिन्ह शोधायला सुरुवात केली आहे. त्यातही ठाकरे गटाने पुढाकार घेत निवडणूक आयोगाला नव्या निवडणूक चिन्हासाठी ३ पर्याय पाठवले असल्याचे समजत आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, ठाकरे गटाने निवडणूक आयोगाला निवडणूक चिन्हासाठी ३ वेगवेगळे पर्याय दिले आहेत. यामध्ये १) त्रिशूळ, २) उगवता सूर्य, ३) मशाल यांचा समावेश आहे. याबरोबरच ठाकरे गटाने पक्षाची ३ संभाव्य नावेही निवडणूक आयोगाला सांगितली आहेत. १) शिवसेना (बाळासाहेब ठाकरे),२) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), ३) शिवसेना (बाळासाहेब प्रबोधनकार ठाकरे) अशी ३ पर्यायी नावे ठाकरे गटाने दिली आहेत.