बाळासाहेब ही म्हणाले असतील… शाब्बास संजय! – केदार दिघे

मुंबई : पत्रा चाळ घोटाळा प्रकरणी तब्बल ९ तासांच्या चौकशीनंतर शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतले आहे. काही महिन्यांपूर्वीच पत्राचाळ प्रकरणात ईडीने राऊत (Sanjay Raut) यांना समन्स बजावले होते. मात्र अधिवेशनाचे कारण सांगून त्यांनी चौकशीला हजर राहण्यास टाळाटाळ केली होती. (Sanjay Raut latest news)हीच टाळाटाळ त्यांना महागात पडल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौकशीदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांना संजय राऊत काही कागदपत्र समाधानकारक देवू न शकल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, संजय राऊत यांना अटक झाल्यानंतर शिवसेना नेते केदार दिघे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले, बाळासाहेब ही म्हणाले असतील..शाब्बास संजय! ना डर,ना सत्तेचा लोभ,ना मला वाचवाची भीक मागितली…तो योध्दा निडर पणे चालला शिवसेनेचा आणि महाराष्ट्राचा मराठीबाणा जोपासण्यासाठी…! दिल्ली समोर झुकणार नाही! जे घाबरून पळाले ते शिवसैनिक असू शकत नाहीत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.