जगण्याची प्रबळ इच्छा असेल तर काहीही होऊ शकते

राणीसावरगाव / गंगाखेड / विनायक आंधळे :- राणीसावरगाव (Ranisawargaon) येथील सामाजिक कार्यकर्ते दयानंद कुदमुळे (Dayanand Kudmale) यांच्या घरासमोरील व्यक्तीने साधारण दीड दोन महिन्या पूर्वी घरात लावलेले झाड एका बाजूला झुकले होते आणि ते वादळ वाऱ्याने घरावर पडेल या भीतीमुळे जमिनी पासून साधारण 4 फुटाच्या वरून ते तोडून टाकले होते. ते तोडलेले झाड रस्त्याच्या कडेला टाकण्यात आले होते.

दयानंद कुदमुळे यांच्या मनात विचार आला हे झाड आपण खड्डा करून लावले तर नक्कीच येऊ शकते पण कामाच्या व्यापामुळे त्यांना शक्य होऊ शकले नाही आणि ते तसेच पडुन राहिले. साधारण दीड दोन महिन्या नंतर त्याच्या कडे सहज लक्ष गेले आश्चर्याची बाब त्या आडव्या टाकलेल्या खोडाला हिरवीगार पालवी फुटली होती मनात विचार आला याची जगण्याची प्रबळ इच्छाशक्ती त्याला मरू देत नाही. आपल्या थोड्याशा कृतीमुळे त्याला संजीवणी मिळणार असेल तर का दुर्लक्ष करावे आणि कामास सुरुवात केली.

सतत सामाजिक कार्यात सहभागी होणाऱ्या मित्र मंडळींनाही हा मनोदय खूप आवडला आणि योगायोग म्हणजे उद्या आर्ट ऑफ लिव्हिंग ची साधना अहिल्यादेवी कॉलेज (Ahilya Devi College) या ठिकाणी ठेवण्यात आली आहे. त्याच गारपिर परिसरात हे झाड लावण्यात येत आहे. विशेष बाब म्हणजे उद्या राणीसावरगाव येथे हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक (Vasantrao Naik) यांची जयंती ज्यांनी हा महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करण्यासाठी ही हरित चळवळ (Green Movement)  उभी केली त्यांच्या विचारांना या कार्यातून राणीसावरगाव हेरिटेज परिवाराकडून त्यांच्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन 01-08-2022 वार, सोमवारी, रोजी सकाळी ठीक 7:30 वाजता करण्यात येणार आहे.

या कार्यात गोविंद जाधव, कैलास जाधव, योगेश कुदमुळे, दिनेश जाधव, सूरज जाधव, समाधान नाटकर यांनी सहकार्य केलं. तसेच, वैचारिक सोबती बापू भिमनपल्लेवार, शिवाजीराव राठोड, डॉ.स्वामी, डॉ.शिंदे, डॉ. रेवणवार, दत्ता जाधव, राहुल चव्हाण हे होते. या सामाजिक कार्याची संकल्पना हेरिटेज ग्रुप आणि आर्ट ऑफ लिव्हिंग परिवार राणीसावरगाव (Heritage Group and Art of Living Parivar Ranisawargaon) यांची आहे.