केजरीवालांचा कॉंग्रेसला धक्का; मातब्बर नेत्याने केला आम आदमी पार्टीत प्रवेश

नवी दिल्ली –  काँग्रेसचे हरियाणा युनिटचे माजी प्रमुख अशोक तंवर ( Ashok Tanwar )यांनी आम आदमी पक्षात (आप ) प्रवेश केला आहे. ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvind Kejriwal )यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला.

AAP मध्ये सामील झाल्यानंतर अशोक तन्वर म्हणाले, लोकप्रिय नेते श्री अरविंद केजरीवाल जी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली जनहिताच्या कार्यामुळे मला आम आदमी पार्टीमध्ये सामील होण्याची प्रेरणा मिळाली आहे. जनतेचा आवाज बुलंद करत पक्षनेतृत्वाच्या विश्वासाला धरून राहण्याचा मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.

यानंतर अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करून म्हटले की, अशोक जी, आम आदमी पार्टी परिवारात आपले स्वागत आहे. विद्यार्थी राजकारणापासून ते संसदेपर्यंतचा तुमचा राजकीय अनुभव हरियाणा आणि देशभरातील पक्ष संघटनेसाठी निश्चितच उपयुक्त ठरेल.

हरियाणातील सिरसा येथून खासदार असलेले तन्वर यांनी 2019 मध्ये काँग्रेस सोडली. ते हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे (HPCC) अध्यक्ष होते. त्यांनी भारतीय युवक काँग्रेस आणि काँग्रेसची विद्यार्थी शाखा, NUSI चे अध्यक्ष म्हणूनही काम केले. नंतर तन्वर यांनी ममता बॅनर्जी यांच्या पक्ष तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये प्रवेश केला. आता तन्वर ‘आप’मध्ये दाखल झाले आहेत.