‘हिंदू मिरवणूकांवर दगडफेक झाली आहे, लक्षात ठेवा आमचे देखील हात बांधलेले नाहीत’

 पुणे – हिंदुत्वाचा (Hindutva) आवाज बुलंद करणारे  मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) हे सध्या पुणे दौऱ्यावर आहेत. शनिवारी हनुमान जयंतीनिमित्त सामूहिक हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राज ठाकरे पत्रकार परिषद (Press conference)  घेतली.  यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेतून दोन मोठ्या घोषणा केल्या आहेत.

५ जून रोजी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह मी अयोध्येला जाणार आहे. पाच तारखेला अयोध्येला पोहचून तिथे दर्शन घेणार आहे, अशी घोषणा राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून केली आहे. यासोबतच महाराष्ट्र दिनी १ मे रोजी मी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेणार आहे, अशी माहिती राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेतून दिली आहे.

पुढे बोलताना ते म्हणाले,  शांतता भंग करणाऱ्या भोंग्यांना परमीट देऊ नका असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय. देशापेक्षा तुमचा धर्म नाही. हिंदू मिरवणूकांवर दगडफेक झाली आहे. लक्षात ठेवा आमचे हात बांधलेले नाहीत.आमच्याकडून मिरवणूक निघत असताना त्यावर दगडफेक होणार असेल तर आम्ही शांत बसणार नाही, आमचे हात काही बांधलेले नाहीत. दगड आम्हालाही हातात घेता येतो. समोर जे कोणतं हत्यार असेल ते आमच्याही हातात द्यायला लावू नका, अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिल्लीतील हिंसाचावरुन दिली आहे.