मुघल लुटारु – दरोडेखोर होते, ताजमहाल प्रेमाचं प्रतिक नाही – मनोज मुंतशिर 

उज्जैन –  गीतकार मनोज मुंतशिर ( Manoj Muntashir )यांनी मुघल शासकांना लुटारु म्हटलं आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन ( Ujjain )येथे आयोजित गौरव दिवस कार्यक्रमात बोलताना  त्यांनी आपल्याला चुकीचा इतिहास शिकवण्यात आल्याचं म्हटलं. सध्या या वक्तव्याचा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

आपल्याला सांगण्यात आलं की, शेरशाह सुरी ( Shershah Suri), अकबर ( Akbar )आणि खिलजी ( Khilji ) यांच्यासारखे शासक नसते तर आपण झाडांची पानं लावून नाचलो असतो, पण या मुर्खांना कोणा सांगणार की यांच्या आधी इथे मोहेंजदडो पण होतं, असं ते म्हणाले.प्रेमाचं प्रतिक जाणून घ्यायचं असेल तर चित्तोड किल्ल्याचा इतिहास जाणून घ्या जिथे माता पद्मिनीने राजा रतन सिंह यांच्यासाठी अग्नीत स्वत:ला झोकून दिलं. प्रेम समजून घ्यायचं असेल तर प्रभू श्रीरामाने सीतेसाठी समुद्रात पूल उभारला त्याचा अभिमान बाळगा. हे प्रेमाचं प्रतिक आहे,” असं मनोज मुंतशिर म्हणाले.

हजारो वर्ष आधी जेव्हा मुघल नव्हते तेव्हा आमच्याकडे महाकाल मंदिर तयार झालं होतं. मुघलांनी २ विटाही जोडणं शिकलेलं नव्हतं तेव्हा आमच्या क्षत्रिय राजांनी उभारलेली मंदिरं होती. अजंठा आमच्याकडे आहे, एलोरा आमच्याकडे आहे आणि कोणार्कही आहे.

एका बाजूला आपण विक्रमादित्य यांना पाहिलं आणि एका बाजूला महान लुटारु, दरोडेखोरांनाही पाहिलं हे आपलं दुर्भाग्य आहे. ताजमहाल बनवला तर ठीक आहे, पण आता आपल्याला तो प्रेमाचं प्रतिक आहे हे सांगण्याचा प्रयत्न करत केला जात आहे”. या राजांनी आपल्या गरिबीची खिल्ली उडवली आणि आता त्याला प्रेमाचं प्रतिक म्हणत असल्याचंही ते म्हणाले.