Kishor Aware Case : सुनील शेळकेंनी आरोप फेटाळले, चौकशीला तयार; सुत्रधार शोधा

पुणे : मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे (Kishore Aware) यांची काल (१२ मे) दिवसाढवळ्या हत्या (Murder of Kishore Aware) करण्यात आली. तळेगावात अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. या घटनेला काही तासही उलटत नाही तोच या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी आता मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against NCP MLA Sunil Shelke in the murder of Kishore Aware). मयत किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे (वय ६९, तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आमदार सुनील शेळके, भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुनील शेळकेंनी सर्व आरोप फेटाळले
मात्र आता सुनील शेळके यांनी त्यांच्यावर लावण्यात आलेले सर्व आरोप फेटाळले असून यामागील सूत्रधार शोधण्याचे आवाहन केले आहे. किशोर आवारे यांची हत्या झाल्यानंतर सुनील शेळके नॉट रिचेअबल असल्याच्या बातम्या काल चालवण्यात आल्या. या प्रकरणात आरोपींची चौकशी पोलीसांकडून केली जात आहे. मागील काही दिवसापुर्वी किशोर आवारे यांच्यासोबत आम्ही राजकारणावर एकत्रित काम केलं आहे. त्यांच्यात विचारांत मतभेद होते परंतु मनभेद नव्हते. परंतु काही लोकांकडून जाणीवपुर्वक राजकारण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सुनील शेळके यांनी सांगितलं आहे. याप्रकरणात जे काही सत्यता आहे ती बाहेर येईल. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. असंही त्यांनी म्हटले आहे.

या घटनेनंतर माझा भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह माझयावर तक्रार दाखल करण्यात आली. अन् या तक्रारीत किशोर आवारे यांच्या हत्येचा कट रचण्यात आलं आहे. असं सांगण्यात आलं. तक्रार दाखल करतांना त्यांच्या कुटुंबीयाची भावना काय असते ती समजून आहे. परंतु तक्रार दाखल करण्यामागे याचे सुत्राधार कोण आहेत. हे पुढील काळात याचा शोध घेण्याचा प्रयत्न करू. तसेच आम्ही विकासाचं राजकारण केलं आहे. असं घाणरेड राजकारण कधीही करणार नाही. असं म्हणत सुनील शेळके यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत.

दरम्यान, मला लोकांनी कामांसाठी, विकासासाठी निवडून दिलं आहे. राजकारणापासून आलिप्त होण्याचं असेल तर आज होईन. परंतु बदनाम करून तुम्ही मला आलिप्त करण्याचा प्रयत्न करत असाल तर असले आरोप कधीही स्विकारणार नाही. अन् याप्रकरणात कुठलीही चौकशी करण्यासाठी मी तयार आहे. माझी चौकशी करा. तसेच या प्रकरणात कोण राजकारण करत आहे. त्यांची देखील चौकशी झाली पाहिजे. असंही सुनील शेळके यांनी म्हटलं आहे.  माझा भाऊ मला आर्थिक पाठबळ देतो, मला मदत करतो. त्याला देखील बदनाम करण्याचं काम करण्याचं केलं तर याद रखा. असंही त्यांनी म्हटलं आहे.