Sunil Tatkare | मोदी संविधान बदलणार असे जाणीवपूर्वक सामाजिक पाप विरोधक करत आहेत, सुनिल तटकरेंचे टीकास्त्र

Sunil Tatkare | तुमची – माझी श्रध्दा या संविधानावर आहे आणि कायम राहणार आहे मात्र नरेंद्र मोदी संविधान बदलणार असे जाणीवपूर्वक सामाजिक पाप विरोधक करत आहेत असा थेट हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी हेदवी येथील सभेत केला.

देशातील एका ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी आपण मतदान करणार आहोत.या देशाची अखंडता, एकात्मता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेच्या माध्यमातून आपल्याला दिली असेही सुनिल तटकरे म्हणाले.

देशात आणीबाणीच्या वेळी उद्रेक झाला आणि त्यातून चळवळ उभी राहून इंदिरा गांधी, संजय गांधी यांचा पराभव झाला ही वस्तुस्थिती सांगताना ही लोकशाही प्रणाली जनतेने त्यावेळी दाखवून दिली. वेगवेगळ्या आघाडयांची सरकारे त्याकाळात अनुभवायला मिळाली. आम्ही भाजपसोबत गेलो मात्र आम्ही आमचा सिध्दांत सोडून दिला नाही. सलग तीन वेळा सरकारे बनली एवढी अस्थिरता देशात निर्माण झाली होती. परंतु नरेंद्र मोदी यांच्या नावाची घोषणा भाजपने केली आणि राजकारणाला वेगळी कलाटणी मिळाली आणि जनतेने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करुन आज दहा वर्षांत झालेला विकास अनुभवत आहोत असेही सुनिल तटकरे यावेळी म्हणाले.

४ जूनला ऐतिहासिक निकाल लागेल आणि त्यानंतर संविधानावर आज ओरड करत आहेत त्यांची ओरड नक्कीच थांबलेली दिसेल असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आज देश विकसित होत आहे. अनेक योजना खेड्यापाड्यात येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना काळात लस तयार केली त्या देशाचे नाव भारत आणि त्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी होते आणि यापुढेही राहतील असा ठाम विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा