‘राष्ट्रवादी कांग्रेसने नाकाने वांगे न सोलता मलिक यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल बोलावं’

मुंबई – राज्याचे अल्पसंख्याक मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक हे आता अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) रडावर आले आहेत. प्राप्त माहितीनुसार नवाब मलिकांना चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयात नेण्यात आलं आहे. या कारवाईनंतर राष्ट्रवादीचे धाबे दणाणले असून नेते आणि कार्यकर्ते भाजप आणि ईडीवर सैरभैर झाल्याप्रमाणे टीका करू लागले आहेत तर दुसऱ्या बाजूला भाजप नेत्यांचा आनंद गगनात मावेना अशी अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.

दरम्यान, दरम्यान, मलिक यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने ईडी कार्यालयासमोर जमा झाले आहेत. नवाब मलिक तुम आगे बढो हम तुम्हारे साथे है अशा घोषणांनी ईडी कार्यालयाचा परिसर दणाणून गेला आहे. तसेच, कोणताही अनुचित प्रकार घडून नये म्हणून येथे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

या सर्व प्रकारावर आता भाजप आमदार राम सातपुते यांनी आपली प्रतिक्रियादिली  आहे. ते म्हणाले, नवाब मलिक यांचे माफिया व अतिरेकी दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक संबंध होते हे आता सिद्ध झाले आहे. प्रत्यक्ष नसेल तरी अप्रत्यक्ष दहशतवाद्यांना खतपाणी घालायचं काम यांनी केलं आहे. राष्ट्रवादी कांग्रेसने नाकाने वांगे न सोलता मलिक यांच्यावर झालेल्या आरोपाबद्दल बोलावं असं आवाहन केले आहे.