KKR vs SRH | केकेआरच्या भेदक गोलंदाजीपुढे ढेपाळली हैदराबादची फलंदाजी, विजयासाठी फक्त ११४ धावांचे लक्ष्य

KKR vs SRH IPL Final : चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर आयपीएल २०२४ अंतिम सामन्याचा थरार रंगला आहे. मात्र या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचे पारडे जड दिसत असून सनरायझर्स हैदराबादने पहिल्याच डावात आपले गुडघे टेकले आहेत. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीला उतरलेल्या हैदराबादला ११३ धावा करतानाही घाम फुटला. कोलकात्याच्या गोलंदाजांनी १८.३ षटकात हैदराबादला सर्वबाद केले. परिणामी कोलकाताला विजयासाठी नाममात्र ११४ धावांचे लक्ष्य मिळाले आहे. ही आजवरची आयपीएल अंतिम सामन्यातील सर्वात निच्चांकी धावसंख्या होती.

हैदराबादची फलंदाजी करताना सुरुवात चांगली झाली नाही. त्यांचा युवा प्रतिभाशाली सलामीवीर अभिषेक शर्मा २ धावांवर बाद झाला. त्याच्यापाठोपाठ ट्रॅव्हिस हेड आणि राहुल त्रिपाठी यांनीही पावरप्लेमध्येच विकेट्स गमावल्या. ऍडम मार्करम आणि नितीश रेड्डी यांनी मिळून संघाला सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु हर्षित राणाने नितीश रेड्डीची विकेट काढत ४७ धावांवर त्यांची भागीदारी मोडली. शेवटी कर्णधार पॅट कमिन्सने सावध खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचे प्रयत्नही व्यर्थ ठरले आणि ९ चेंडू शिल्लक असताना केवळ ११३ धावांवर संघ गुंडाळला गेला.

या डावात कोलकाताकडून आंद्रे रसेलने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. तसेच मिचेल स्टार्क आणि हर्षित राणानेही प्रत्येकी २ विकेट्सचे योगदान दिले. वरुण चक्रवर्ती, वैभव अरोरा आणि सुनील नारायण यांच्या वाट्यालाही प्रत्येकी १ विकेट आली.

महत्वाच्या बातम्या-

Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Ashish Shelar | उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?, आशिष शेलार यांचा सवाल

KKR VS SRH | “आम्ही सर्वोत्तम संघांपैकी एक…”, फायनलपूर्वी हैदराबादचा कर्णधार कमिन्सचे केकेआरला आवाहन