ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानाचा राग धरून दोन दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला; भुजबळांनी केली ‘ही’ मागणी

Chhagan Bhujbal:- राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीतील मतदानाचा राग धरून दोन दलित कुटुंबावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचा तीव्र निषेध करत असून पोलिसांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी अशा सूचना राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत. राहता तालुक्यात घडलेल्या घटनेचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने निषेध व्यक्त करत आज नागपूर येथे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि मंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले की, राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा राग मनात घेऊन दोन दलित कुटुंबावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. यामध्ये कुटुंबातील लोकांना मारझोड करत जीवे मारण्याचा प्रकार घडला. अगदी लहान मुलांना देखील दगडावर आपटून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. या घटनेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे मात्र अद्याप एकालाही अटक करण्यात आलेली नाही. याबाबत पोलिसांनी विशेष लक्ष देऊन कठोर कारवाई करण्याची गरज आहे. फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात असे समाजविघातक प्रकार घडत असतील तर ही राज्यासाठी शरमेची बाब आहे. असे प्रकार महाराष्ट्रात कुठेही होणार नाही याची दखल पोलिसांसह सर्वांनी घ्यायला हवी असे त्यांनी सांगितले.

ते म्हणाले की, राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथे घडलेल्या या घटनेचा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो. या घटनेत कुठल्याही धर्माचे तसेच पक्षाचे लोक असतील तरी देखील त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. त्यामुळे पोलिसांनी दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी असे छगन भुजबळ यांनी म्हटले आहे.

महत्वाच्या बातम्या-

हिवाळी अधिवेशनात विदर्भ, मराठवाड्याच्या प्रश्नांसह विविध प्रश्नांना न्याय देणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

अजितदादा नेहमीच सह्याद्रीसारखे आव्हाडांच्या मागे उभे राहिले पण आव्हाडांनी अजितदादांचा कायमच तिरस्कार केला

बाजारात मिळतं एकूण १० प्रकाराचं मीठ, जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते मीठ आहे उत्तम