Kopardi Case: महाराष्ट्राला हादरवणाऱ्या कोपर्डी प्रकरणातील आरोपी नराधमाने कारागृहात जीवन संपवलं

Kopardi Rape Case : महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील कोपर्डी हत्या प्रकरणातील (Kopardi Rape Case) आरोपी जितेंद्र शिंदे याने येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली असल्याची घटना उघडकीस आली आहे. आज पहाटेच्या सुमारास स्वत:च्या कपड्याने त्याने गळफास लावून आपलं जीवन संपवलं आहे.

काय आहे कोपर्डी प्रकरण?

13 जुलै 2016 रोजी कोपर्डीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली.नोव्हेंबर 2017 मध्ये जितेंद्र शिंदे, नितीन भैलुमे, संतोष मवाळ यांना दोषी ठरवण्यात आले.जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा आणि उर्वरित दोघांना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

फाशीच्या शिक्षेच्या विरोधात जितेंद्र शिंदेकडून मुंबई हायकोर्टात अपील करण्यात आलं. जितेंद्र शिंदेच्या याचिकेवर मुंबई हायकोर्टात सुनावणी सुरुच आहे. सप्टेंबर 2023 रोजी जितेंद्र शिंदेला फाशीची शिक्षा देण्यात यावी मागणीसाठी कोपर्डी ग्रामस्थांनी उपोषण केले होते. 10 सप्टेंबर 2023 रोजी जितेंद्र शिंदेची येरवडा कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आनंदाचा शिधा’ वाटपात लाभार्थी वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी – छगन भुजबळ

तुम्ही PIN शिवाय 500 रुपये पाठवू शकता, Paytm वर UPI Lite सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

पाकिस्तान जिंकेल वनडे विश्वचषक, शोएब अख्तरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, भारत…

रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस