Crime News : कायदा सुव्यवस्थेचे वाजले बारा; काँग्रेस नेत्याला भर बाजारात गोळ्या घालून संपवलं 

Rajsthan Crime News : काँग्रेस नेते मेहताबसिंग गुर्जर (Mehtab Gujjar)  यांचा शुक्रवारी संध्याकाळी धौलपूरच्या मानिया शहरात अर्धा डझनहून अधिक लोकांनी मार्केटमध्ये केलेल्या अंदाधुंद गोळीबारात मृत्यू झाला. हल्लेखोरांनी गोळीबार करून दहशत पसरवत बाजारपेठेतून पळ काढला. हीच घटना बाजारात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे. पोलिसांनी शहराभोवती नाकाबंदीही केली, पण हल्लेखोर सापडले नाहीत.  मिळालेल्या माहितीनुसार पूर्व वैमनस्यातून आरोपींनी काँग्रेस नेत्याची हत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे मंगरूळ मंडल अध्यक्ष 50 वर्षीय मेहताब सिंग गुर्जर हे काही साहित्य घेण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी मानिया शहरात आले होते. मानिया शहरातील गजबजलेल्या बाजारपेठेत अर्धा डझन दुचाकीस्वार हल्लेखोरांनी मेहताब गुर्जर यांच्यावर अंदाधुंद गोळीबार केला.

या प्रकरणी धोलपूरचे अतिरिक्त एसपी ओम प्रकाश मीना यांनी सांगितले की, मेहताब सिंग गुर्जर यांची सुमारे अर्धा डझन हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. हल्लेखोर फरार झाले आहेत. पोलिसांकडून हल्लेखोरांची ओळख पटवली जात आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिस सातत्याने छापेमारी करत आहेत. रात्री उशिरा पोलिसांनी शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात दिला, तसेच हत्येचा गुन्हा दाखल करून हल्लेखोरांचा शोध सुरू केला.

 महत्त्वाच्या बातम्या-
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी बुमराह परतला, ‘या’ प्लेइंग इलेव्हनसह भारत देणार तगडे आव्हान

राजकारणात अस्पृश्यता पाळत असल्याची घणाघाती टीका! आंबेडकरांचा काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसवर हल्लाबोल

ग्रामविकास विभागाच्या भरतीप्रक्रियेतील उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये – मंत्री गिरीश महाजन