Live In Relationship | लिव्ह-इन पार्टनरने धोखा दिला तर तुमच्याकडे असतील हे अधिकार, जाणून घ्या

Uttarakhand UCC Bill And Live In Relationship :  एक काळ असा होता की पालक लग्नाआधी मुलगा आणि मुलीला एकमेकांशी बोलू देत नसत, भेटू देत नसत. घरच्यांच्या पसंतीवरच मुलाचे आणि मुलीचे लग्न होत असतं. पण आता वेळ आणि समाज दोन्ही बदलले आहेत. आजकाल बहुतेक लोक लिव्ह-इन रिलेशनशिप मध्ये (Live In Relationship) राहणे पसंत करतात.

याचा स्पष्ट अर्थ म्हणजे लग्नाआधी एकमेकांसोबत राहणे, पण फरक एवढाच आहे की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आपण एकमेकांना ओळखतो, एकमेकांना समजून घेतो आणि जर कोणी आपल्याला आवडत असेल तर आपण एकत्र आयुष्य घालवतो. पण जर इकमेकांची संगत आवडत नसेल तर वेगळे होतो. येथे आम्ही लिव्ह-इन रिलेशनशिपच्या नियमांबद्दल बोलत आहोत, जे बहुतेक लोकांना माहिती नसतात, ज्यामुळे त्यांना नंतर समस्यांना सामोरे जावे लागते, तर चला आम्ही तुम्हाला याबद्दल माहिती देतो-

नोंदणी आवश्यक आहे
उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर विवाह, घटस्फोट, वारसा हक्क, लिव्ह-इन रिलेशनशिप आदी बाबींचे नियम व कायदे एकसमान होणार आहेत. नव्या कायद्यात लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या जोडप्यांच्या पोटी जन्मलेल्या बाळालाही संपत्तीवर पूर्ण अधिकार देण्यात आला आहे. लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आल्यानंतर, पुरुष आपल्या महिला जोडीदाराची फसवणूक करू शकत नाही आणि असे काही घडल्यास, महिला न्यायालयात तिच्या जोडीदाराकडून नुकसान भरपाईची मागणी करू शकते.

विधेयकात काय तरतूद आहे?
नव्या कायद्यात लिव्ह-इन रिलेशनशिपमधून जन्माला आलेले मूल कायदेशीर मानले गेले आहे. याशिवाय मुलाच्या पालनपोषणाची जबाबदारी पुरुषांना घ्यावी लागेल आणि त्यांना त्यांच्या मालमत्तेत समान अधिकार द्यावा लागेल. उत्तराखंड हे देशातील पहिले राज्य ठरले आहे ज्यामध्ये नवा कायदा लागू होणार आहे.

लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये असलेल्यांसाठी महत्त्वाच्या गोष्टी
-विवाहित लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू शकत नाही.
-लिव्ह-इन रिलेशनशिप नोंदणीपूर्वी, रजिस्ट्रार अर्जदाराची तपासणी करतील.
-नोंदणीपूर्वी लिव्ह-इन जोडप्यांना कॉल करण्याचा किंवा त्यांची चौकशी करण्याचा अधिकारही रजिस्ट्रारला असेल.
-लिव्ह-इन नोंदणीची प्रक्रिया ३० दिवसांत पूर्ण केली जाईल.
-लिव्ह-इन संपल्याची माहिती रजिस्ट्रारला देणेही बंधनकारक आहे.
-जर तुम्हाला लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे नसेल, तर तुम्हाला तुमच्या पार्टनरलाही याची माहिती द्यावी लागेल.
-जे लोक लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये आहेत त्यांनाही पोलीस ठाण्यात माहिती द्यावी लागेल.
-जर तुम्ही एक महिन्याच्या आत नोंदणी पूर्ण करू शकला नाही तर तुम्हाला 3 महिने तुरुंगवास आणि 10,000 रुपये दंड होऊ शकतो.
-लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये जर कोणी खोटी माहिती दिली तर त्याला 3 महिन्यांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपयांचा दंड होऊ शकतो.

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ