Dilip Walse Patil | राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभा जाहीरनामा समिती स्थापन; अध्यक्षपदी दिलीप वळसे पाटील यांच्या नावाची घोषणा

Dilip Walse Patil | लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने जाहीरनामा समिती स्थापन करण्यात आली असून अध्यक्षपदी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) तर निमंत्रक म्हणून पक्षाचे कोषाध्यक्ष आणि प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचे पत्र प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी प्रसिद्धीला दिले आहे.

या जाहीरनामा समितीमध्ये सदस्य म्हणून कृषीमंत्री धनंजय मुंडे, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी मंत्री बाबा सिद्दीकी, राष्ट्रीय प्रवक्ते अविनाश आदिक, मुंबई विभागीय अध्यक्ष समीर भुजबळ, महिला प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश सरचिटणीस नजीब मुल्ला, अल्पसंख्याक सेलचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवडी, ओबीसी सेलचे राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक सेलचे प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे,मुख्य प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, माध्यम सल्लागार संजय मिस्कीन आदींचा समावेश आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आमची लढाई – Muralidhar Mohol

Eknath Shinde | मोदींना औरंगजेबाची उपमा देणं म्हणजे देशद्रोह, एकनाथ शिंदे यांचा संजय राऊत यांच्यावर हल्ला

Ravindra Dhangekar | रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर होताच पुण्यातील कॉंग्रेसमधील जेष्ठ नेता नाराज