Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ

Maharashtra Kranti Sena : राज्यातील मराठा समाजासह वंचित घटकांच्या प्रश्नांवर कार्य करणारी महाराष्ट्र क्रांती सेना (Maharashtra Kranti Sena) महायुतीमध्ये सामील झाल्याची माहिती महायुतीचे समन्वयक आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्र क्रांती सेना ही महायुतीचा घटक पक्ष म्हणून कार्य करेल असे श्री.लाड यांनी पत्रकात नमूद केले आहे .

आ.लाड यांनी पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्र क्रांती सेनेच्या सहभागामुळे महायुतीला अधिक बळ मिळणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule),राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) तसेच महायुतीतील इतर घटक पक्षांच्या सहमतीने महाराष्ट्र क्रांती सेना महायुतीमध्ये सामील झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विकासाचे नवे उच्चांक गाठत असून आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीचा ‘महाविजय 2024’ हा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी महायुतीतील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करतील असा विश्वासही आ.लाड यांनी पत्रकात व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या : 

Ajit Pawar | ‘आयत्या बिळावर नागोबा’ असणारे हे लोक दुसऱ्याचा पक्ष फोडणारे ‘गद्दार’ आहेत

Supriya Sule | मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणाच्या प्रश्नावर संसदेत सुप्रिया सुळे यांनी वेधले लक्ष

Ajit Pawar | पक्षाची भूमिका पुढे वृध्दींगत करण्यासाठी आम्ही कालही कटीबद्ध होतो… आजही आहोत आणि भविष्यातही राहू

Previous Post
Live In Relationship | तुरुंगात जायचे नसेल तर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्यांना हे नियम माहितीच असायला पाहिजेत !

Live In Relationship | तुरुंगात जायचे नसेल तर लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहणाऱ्यांना हे नियम माहितीच असायला पाहिजेत !

Next Post
Central Mard Organization |अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील निवासी डॉक्टरांनी प्रस्तावित संप घेतला मागे

Central Mard Organization |अजित पवार यांनी केलेल्या आवाहनानुसार राज्यातील निवासी डॉक्टरांनी प्रस्तावित संप घेतला मागे

Related Posts
सर्वांचीच सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं बघून समाधान वाटतंय - नितेश राणे

सर्वांचीच सकाळ खराब करणाऱ्यांची सकाळ खराब झाल्याचं बघून समाधान वाटतंय – नितेश राणे

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची बाजू एकहाती लावून धरणारे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड…
Read More
देवेंद्र फडणवीस- एकनाथ शिंदे

अतिवृष्टीग्रस्तांना राज्य शासनाचा मोठा दिलासा; एनडीआरएफच्या मदतीपेक्षा दुप्पट मदत मिळणार 

मुंबई – गेल्या दोन महिन्यात राज्यात झालेल्या अतिवृष्टी आणि जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या…
Read More

1 दिवसात 5000 कॉल येऊ शकतात, मग 21 लाख कसे आले? सिद्धूंनी केली आपची पोलखोल

चंडीगड – काँग्रेस नेते आणि प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबच्या मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यासाठी फोन नंबरवर आम आदमी पार्टीच्या…
Read More