Maharashtra Assembly Elections | विधानसभेची तयारी झाली सुरु; शिवसेनेच्या आमदार-खासदारांची आज बैठक

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आज आमदार, खासदारांची बैठक होणाराय… येणा-या विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Elections ) कसे सामोरे जायाचे, कोणत्या मुद्यावर लक्ष केंद्रित करायचे यावर चर्चा केली जाणार आहे…तर लोकसभेत किती मतदान कोणाला झाले याचादेखील आढावा घेण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय…लोकसभेप्रमाणे विधानसभेला उमेदवारी उशीरा घोषित न करता लवकर उमेदवारी घोषित करण्यासाठी तयारी सुरू आहे…तसंच विधानसभेला खासदारांची कशी मदत होईल याचंही प्लानिंग केलं जाणार असल्याची माहिती मिळतेय.

प्रथम मुख्यमंत्र्यांची आमदारांसोबत 6 वाजता वर्षा निवास येथे बैठक होईल आणि त्यानंतर 7 वाजता खासदारांसोबत बैठक होईल. या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या निकालासह आगामी विधानसभा निवडणुका आणि राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा होणार आहे. महाराष्ट्रात या वर्षी सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्याचबरोबर राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 26 जूनपासून सुरू होणार असून त्यापूर्वी शिंदे मंत्रिमंडळाचा विस्तारही होऊ शकतो आणि काही मंत्रिपदेही विभागली जाऊ शकतात.

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Elections ) काँग्रेसनेही तयारी सुरू केली आहे. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी लोकसभा निवडणुकीतील पक्षाच्या चांगल्या कामगिरीनंतर आता विरोधी महाविकास आघाडीला बळकट करण्याची जबाबदारी आपल्या पक्षाची आहे, असे सांगून विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी राज्य युनिटला आवाहन केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सलग तिसऱ्यांदा घेतली शपथ, राष्ट्रपती भवनात पार पडला सोहळा

Modi’s Cabinet : महाराष्ट्रातील 6 खासदारांना मंत्रिपदासाठी फोन; जाणून घ्या कुणाला मिळणार संधी?

Murlidhar Mohol : नगरसेवक, महापौर ते थेट केंद्रात मंत्री! मुरलीधर मोहोळांना लॉटरी!