महाराष्ट्रात लवकरच समान नागरी कायदा लागू होईल : देवेंद्र फडणवीस

मुंबई –  केंद्र सरकारकडून समान नागरी कायदा लागू करण्याची तयारी केली जातेय, काही राज्यं समान नागरी कायदा लागू करताहेत. राज्यात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी योग्य वेळी विचार करू, असं विधान फडणवीसांनी केलं आहे. महाराष्ट्रात लवकरच समान नागरी संहिता लागू होणार असल्याचेफडणवीस यांनी सांगितले. मात्र त्याची घोषणा मुख्यमंत्री करतील असं देखील ते म्हणाले.(Maharashtra to implement Uniform Civil Code soon: Devendra Fadnavis)

देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, देशातील सर्व राज्यांमध्ये समान नागरी संहिता लागू करण्यात येत आहे. केंद्रीय गृहमंत्र्यांनी सर्व राज्यांना समान नागरी संहिता कायदा स्वतः लागू करण्यास सांगितले आहे. त्यामुळे सर्वच राज्यांनी या संदर्भात कधी ना कधी निर्णय घ्यावाच लागेल. सर्व राज्ये आपापल्या सोयीनुसार त्याची अंमलबजावणी करत आहेत. महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी करण्याचा विचार केला जात आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, गोव्यात समान नागरी संहिता लागू करण्यात आली असून उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि गुजरातमध्ये त्याची अंमलबजावणी होणार आहे. महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी करण्याची तयारी सुरू आहे, मात्र ती जाहीर करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना आहे.