‘शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही..यात शिवरायांचा अपमान नाही?’ 

ठाणे – सध्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत राजकीय नेत्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे रोज नवे वाद निर्माण होत आहेत. भाजप आणि शिंदे गटातील काही नेत्यांनी महाराजांच्या बाबत केलेल्या वक्तव्यावरून विरोधीपक्ष शिंदे गट आणि भाजपवर टीका करत आहे. या टीकेला आता जोरदार प्रत्युत्तर शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी दिले आहे. म्हस्के म्हणाले, यात शिवरायांचा अपमान नाही? शरद पवार म्हणतात, शिवरायांना जाणता राजा म्हणायची काहीच गरज नाही..यात शिवरायांचा अपमान नाही?

भ्रष्टवादींच्या गजभियेना महाराज बनून ऐऱ्या गैऱ्याला मुजरा घालताना शरम वाटत नाही? यात शिवरायांचा अपमान नाही? येता जाता शिवरायांच्या प्रेमाचे स्वार्थी उमाळे येणाऱ्या शरद पवारांनी एकदाही एखादा गड चढला नाही यात शिवरायांचा अपमान नाही? शाहिस्त्याची बोटं छाटतानाच्या देखाव्यात शिवरायांना शरदमुखचंद्र कार्यकर्ते चिकटवतात भ्रष्टवादीच्या ऑफिशियल अकाउंट वरून ट्विट करतात यात शिवरायांचा अपमान नाही?

उद्धव ठाकरेंचा एक पोपट राऊत दम तर तसा काहीच नाही भाऊत पण मागतो पुरावे शिवरायांच्या वंशजांना सिद्ध करा म्हणतो तुमच्या रक्तातल्या शिवाजींना यात शिवरायांचा अपमान नाही? औरंग्याच्या कबरीवर वाहिली फुले कबरीला त्या नराधमाच्या संरक्षण दिले यात शिवरायांचा अपमान नाही?अंधारे बाई तर कहरच करतात, निष्पापांच्या घरावर डल्ला मारणाऱ्या रौताला गुन्ह्यात अटक झाल्यावर त्याच्या आईची तुलनाजिजाऊशी करतात यात शिवरायांचा अपमान नाही? हजारो हिंदू यमसदनी धाडले त्याच टिपू सुलतानाचे नाव यांनी पालिकेच्या मैदानाला दिले यात शिवरायांचा अपमान नाही का असे जहरी आणि रोखठोक सवाल त्यांनी उपस्थित केले आहेत.