Mahesh Tapase | पवार साहेबांबद्दल केलेलं गृहमंत्र्यांचे वक्तव्य अशोभनीय, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश तपासे यांची टीका

Mahesh Tapase | महाराष्ट्र वाहतोय शरद पवारांचे (Sharad Pawar)ओझे असे वक्तव्य भाजपचे नेते तथा देशाचे गृहमंत्री अमित शाहा (Amit Shah) यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार साहेब यांच्या बद्दल जाहीर सभेतून केले. या टिकेला राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी प्रत्युत्तर देत अमित शाहा यांच्यावर चांगलाच हल्लाबोल केला आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचे वक्तव्य दुर्दैवी व त्यांच्या पदाला अशोभनीय असल्याची टीका महेश तपासे यांनी केली.

पवार हे देशातले एक मोठं नाव आहे आणि त्यांनी केलेल्या कार्याची माहिती कदाचित शहा यांना त्यांच्या स्पीच रायटरने दिली नसावी म्हणून त्यांनी असं वक्तव्य केलं की काय असा टोला तपासे यांनी लगावला. पवार साहेबांनी महाराष्ट्राचा विकास घडवलाच त्याचबरोबर देशपातळीवर कृषी क्रांती ही घडवली याचा विसर भाजपला पडला आहे. याउलट आज देश पातळीवर शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश विद्यमान मोदी सरकार (Modi Govt) बाबत आहे याची आठवण ही महेश तपासे यांनी करून दिली.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

Amit Shah | उद्धव ठाकरेंना आदित्य आणि शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचंय, अमित शाहांचा हल्लाबोल

Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान