राम आमचा शत्रू आहे, रामायणावर आमचा विश्वास नाही… तमिळनाडूच्या नेत्याचे वादग्रस्त विधान

DMK Leader A Raja: तामिळनाडूचे डीएमचे नेते ए. राजा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. मी रामायण आणि भगवान राम मानत नाही, असे राजाने म्हटले आहे. राजा म्हणाले की, ‘जर हा तुमचा जय श्री राम असेल, जर ही तुमची भारत माता की जय असेल, तर ते जय श्री राम आणि भारत माता की जय तामिळनाडू कधीही मान्य करणार नाही.’ असे द्रमुक नेते म्हणाले. तसेच आम्ही रामाचे शत्रू असल्याचे त्यांनी सांगितले.

द्रमुक नेत्याच्या वक्तव्यावर भारतीय जनता पक्षाने सडकून प्रत्युत्तर दिले आहे. भाजपाने म्हटले आहे की, भारतीय श्रद्धेचा अपमान करणे, भारतीय संस्कृती आणि मूल्यांची निंदा करणे हा भारत गणधनाचा राजकीय अजेंडा बनला आहे. भाजपने म्हटले की, द्रमुकचा एक नेता काल सुप्रीम कोर्टात गेला होता, बघा कोर्टाने त्यांच्यावर काय टिप्पणी केली.

भारतीय जनता पक्ष काय म्हणाला?
भाजपाने ए. राजा यांच्या प्रभू रामाबद्दलच्या वक्तव्यावर म्हटले की, भारत हा कधीच देश नसून उपखंड होता. या राजाच्या विधानावरही तीव्र आक्षेप घेण्यात आला आहे. भाजपने याला माओवादी विचारसरणी म्हटले आहे. भाजपने कठोर शब्दात म्हटले आहे की, ‘ज्या व्यक्तीने तामिळनाडूला रामाचे शत्रू म्हटले, तीच व्यक्ती टूजी घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहे. शिवाय भाजपने सोनिया गांधी, राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांना राम तमिळनाडूचे शत्रू असल्याचं वक्तव्य मान्य आहे की नाही ते सांगण्यास सागितले आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन