Amit Shah | महाराष्ट्र 50 वर्षांपासून तुमचा भार सोसतोय! अमित शाह शरद पवारांवर बरसले

Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. यावेळी जळगाव येथे सभेला संबोधित करताना अमित शाह यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना 10 वर्षांचा हिशोब मागताय, मात्र जनता 50 वर्षांपासून तुम्हाला सहन करतेय, अशा शब्दांत अमित शाह यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळातील 10 वर्षांच्या कामाचा हिशेब विरोधकांकडून मागितला जातो. पण मी शरद पवारांना सांगू इच्छितो की, महाराष्ट्राची जनता गेल्या 50 वर्षांपासून तुमचा भार वाहत आहे. तुम्ही त्या 50 वर्षांचा सोडा पण साध्या पाच वर्षांचा तरी हिशेब जनतेला द्या. मग मोदींच्या 10 वर्षांचा हिशेब मागा, अशा शब्दांत अमित शाह (Amit Shah) यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांना लक्ष्य केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या : 

मुरलीधर मोहोळांनी अनुभवला ‘मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा’

‘वडिलांना धमकी दिली तर…’, हर्षवर्धन पाटलांना मिळालेल्या धमकीवरुन कन्येचा अजित पवारांना इशारा

शिवरायांच्या धोरणाने चालत सर्वत्र जातीपाती एकत्र करुया, इतिहासकार Namdev Jadhav यांचे आवाहन