भाजपसाठी दक्षिण भारताचे दरवाजे सीलबंद, कर्नाटकने भाजपला सत्तेतून बाहेर फेकले- महेश तपासे

मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीत (Karnataka Assembly Election 2023) काँग्रेस पक्षाच्या दणदणीत विजयाबद्दल अभिनंदन करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) म्हणाले की, दक्षिण भारताने आता भाजपसाठी आपले दरवाजे कायमचे सीलबंद केले आहेत.

कर्नाटकच्या मतदारांनी धार्मिक ध्रुवीकरण आणि फुटीरतावादी राजकारणापेक्षा विकास आणि धर्मनिरपेक्षता निवडली आहे याचे समाधान आहे. प्रसारमाध्यमांना दिलेल्या निवेदनात तपासे म्हणाले की, कर्नाटकातील पराभव म्हणजे पंतप्रधान मोदींच्या प्रतिमेची घसरण म्हणून पाहिले पाहिजे. हा पंतप्रधानांचा वैयक्तिक पराभव आणि सर्व धर्मनिरपेक्ष शक्तींचा विजय आहे. आता मतदार जुमला किंवा कोणत्याही प्रकारच्या धार्मिक ध्रुवीकरणाला बळी पडत नाहीत.

राष्ट्रवादीचे प्रवक्ते तपासे पुढे म्हणाले कर्नाटक निवडणुकीच्या निकालांनी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत यूपीएच्या पुनरागमनाचा मार्ग मोकळा केला आहे और अब दिल्ली दूर नहीं.