या सरकारला आमचं आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या – ठाकरे

मुंबई: अखेर उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या वंचित बहुजन आघाडीत युती झाली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन युतीची घोषणा केली. वंचित आघाडी आणि ठाकरे गट आगामी निवडणुका एकत्रितपणे लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिंदे गटासाठी मोठं आव्हान उभं राहणार आहे असं सांगितले जात आहे.

यावेळी बोलताना ठाकरे म्हणाले, वंचितलाही महाविकास आघाडीत जागा दिल्या जातील. अजून जागा वाटप झालेलं नाही. पण महाविकास आघाडीने जागा वाटपाची चर्चा सुरू केली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं. या सरकारला आमचं आव्हान आहे, हिंमत असेल तर निवडणुका घ्या. आमच्या युतीचं जागा वाटप कसं झालंय? काय झालंय हे लवकरच कळेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.(Our challenge is to this government, take elections if you have courage – Thackeray).

पुढे ते म्हणाले, जनतेला नको त्या वादात अडकवून भ्रमात ठेऊनच हुकुमशाही येते. त्याच वैचारिक प्रदुषणातून देशाला मोकळा श्वास घेता यावा यासाठी, देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी आणि घटनेचं पावित्र्य जपण्यासाठी आम्ही दोघे एकत्र येत आहोत.