Dagdusheth Halwai Ganapati | ‘दगडूशेठ’ मंदिरात सुवर्ण पाळण्यात दुपारी १२ वाजता गणेशजन्म सोहळा

पुणे : श्रीमंत दगडूशेठ हलवाई (Dagdusheth Halwai Ganapati) सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिरात मंगळवार, दिनांक १३ फेब्रुवारी दुपारी १२ वाजता सुवर्णपाळण्यात श्री गणेशजन्म सोहळा होणार आहे. मंगळवारी पहाटे ३ वाजल्यापासून दिवसभर गणपती मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले असून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण यांनी दिली.

मंगळवारी पहाटे ३ वाजता ब्रह्मणस्पती सूक्त अभिषेक होणार असून पहाटे ४ ते सकाळी ६ यावेळेत किराणा घराण्याच्या गायिका विदुषी पद्मा देशपांडे या स्वराभिषेकातून श्रीं च्या चरणी गायनसेवा अर्पण करणार आहेत. सकाळी ६ ते ११ आणि दुपारी १.३० ते सायंकाळी ६ यावेळेत गणपती सूक्त अभिषेक देखील होणार आहेत.

मुख्य गणेशजन्म सोहळा (Dagdusheth Halwai Ganapati) दुपारी १२ वाजता होणार असून यावेळी पुष्पवृष्टी देखील होणार आहे. यंदा देखील सुवर्ण पाळण्यात हा गणेशजन्म सोहळा पार पडणार आहे. सायंकाळी ६ वाजता नगरप्रदक्षिणा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी व गणेशभक्त मोठया संख्येने सहभागी होतील. रात्री ८ वाजता महाआरती व त्यानंतर रात्री १० ते पहाटे ३ पर्यंत श्री गणेश जागर आयोजित करण्यात आला आहे. मंदिरात फुलांची आकर्षक सजावट करण्यात येणार असून, भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या : 

अशोक चव्हाणांनी राजीनामा देताच Ramdas Athawale यांची मोठी ऑफर; म्हणाले, रिपल्बिकन पक्षात…

“काँग्रेस लोकशाही वाचवण्याची लढाई लढत असताना, सगळं काही दिलेले नेते..”, नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

“कोणाबद्दल मी तक्रार करणार…”, आमदारकीच्या राजीनाम्यानंतर अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया