भाजपचा संदेश आला आहे, ‘आप’ फोडा आणि आमच्यासोबत या, आम्ही सर्व खटले बंद करू – सिसोदिया

नवी दिल्ली- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपने त्यांना पक्षात येण्याचा संदेश दिला असून तसे केल्यास त्यांच्यावरील सर्व खटले बंद करण्यात येतील, असे त्यांनी म्हटले आहे. मनीष सिसोदिया यांनी गुजरात दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वीच हा दावा केला आहे. अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

मनीष सिसोदिया यांनी याबाबत ट्विट केले आहे. त्यांनी लिहिले, मला भाजपचा संदेश मिळाला आहे –  आप  तोडून भाजपमध्ये जा, सीबीआय ईडीचे सर्व खटले बंद होतील. भाजपला माझे उत्तर – मी राजपूत आहे, महाराणा प्रतापांचा वंशज आहे. मी माझे डोके कापून टाकेन. पण मी भ्रष्ट-कारस्थानांपुढे झुकणार नाही. माझ्यावरील सर्व खटले खोटे आहेत, तुम्हाला जे करायचे ते करा.