समर्थ रामदासांच्या जन्मगावातील राम मंदिरातून ऐतिहासिक मूर्ती चोरीला

जांब – समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी ‘जांब समर्थ’ येथील राम मंदिरातून (Ram Mandir) ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. माहितीनुसार मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मुर्त्या चोरी करण्यात आल्या आहेत. समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची (Ram Laxman Sita) मूर्ती देखील चोरीला गेली आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रूघ्न) देखील चोरीला गेले आहे.

समर्थ झोळीत ठेवत असलेली तसेच दंडात बांधत असलेल्या मारोतीच्या मुर्त्या देखील चोरीला गेल्या आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्री 3 च्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. पाळत ठेऊन मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करत आहेत. एबीपी माझाने याबाबत वृत्त दिले आहे.