manoj jarange | ‘मनोज जरांगे हे शरद पवारांचेच बियाणे, त्यांचा खरा चेहरा मी समोर आणणार’

manoj jarange patil : जेष्ठ कीर्तनकार अजय बारसरकर (Ajay Barsarkar) यांनी केलेल्या आरोपांनंतर आता मराठा रणरागिणी संगीता वानखेडे (Sangeeta Wankhede) यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर हल्ला चढवला आहे. मनोज जरांगे हा स्वार्थी माणूस आहे, जे आतापर्यंत राजकीय नेत्यांनी तेच जरांगे करतोय, शरद पवार हेच मनोज जरांगेचा बोलवता धनी आहेत, असा दावा संगीता वानखेडेंनी केला आहे.

मनोज जरांगे (manoj jarange ) हे शरद पवारांचेच बियाणे असून आगामी निवडणुकीत ते शरद पवारांच्या पक्षाला मतदान करण्याचे आवाहन देखील करणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे. जरांगे हा स्वार्थी माणूस;त्याचा खरा चेहरा मी समोर आणणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. नेमके काय म्हणाल्या संगीता वानखेडे, पाहा खाली दिलेल्या व्हिडिओतून….