Vijay Vadettiwar – महायुती सरकारच्या काळात ड्रग माफियांचा सुळसुळाट वाढला

Vijay Vadettiwar :- विद्येचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात 2200 कोटींचे ड्रग्ज सापडले. सरकारच्या नाकर्तेपणामुळे पुण्याला ड्रग्जचा विळखा पडला आहे. महायुती सरकारच्या काळात ड्रग माफियांचा (Drug mafia) सुळसुळाट वाढला असून सरकारची डोळेझाक कशासाठी; ड्रग माफियांना कुणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सवाल विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Vadettiwar) यांनी केला आहे.

वडेट्टीवार म्हणाले की, पुणे पोलिसांच्या इतिहासातील सगळ्यात मोठी कारवाई मागील दोन दिवसांत झाली आहे. पुणे पोलिसांनी पुण्यातून जवळपास 2200 कोटींचे ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये कारवाई केली. पण पुण्यातील ड्रग्जची व्यप्ती आणखी मोठी असल्याचे बोलले जात आहे. तरीही सरकार ड्रगच्या समूळ उच्चाटनासाठी धडक कारवाई करत नाही. सरकार डोळेझाक करत आहे.

राज्यातील तरुणाईला वाचविण्यासाठी ड्रग माफियांचा सरकारने वेळीच बंदोबस्त केला पाहिजे. सरकारने धडक कारवाई करून जरब बसविली पाहिजे. अन्यथा हे ड्रग माफिया तरुणाईला देशोधडीला लावतील. सरकारने याकडे डोळेझाक करू नये. ज्यांच्या आशीर्वादाने ड्रग रॅकेट सुरु आहे त्यांच्या देखील मुस्क्या सरकारने आवळल्या पाहिजेत. सरकारने ड्रग प्रकरण गांभीर्याने घेऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणीही वडेट्टीवार यांनी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

मनोज जरांगे हेकेखोर, त्याला काडीची अक्कल नाही; जरांगे पाटलांवर सर्वात मोठा आरोप

‘व्यापाऱ्यांना तारा आणि शेतकऱ्यांना मारा असा या सरकारचा नारा!’

Maratha Reservation ने महायुती सरकारचा पारदर्शी प्रामाणिकपणा सिद्ध! भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळे यांचे प्रतिपादन