तोट्यात असलेलं एसटी महामंडळ नफ्यात आल्याचा मंत्री उदय सामंत यांचा दावा

Uday Samant तोट्यात असलेलं एसटी महामंडळ (ST Mahamandal) पुन्हा ऊर्जितावस्थेत आलं असून एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी शासनाला द्यावं लागणारे अनुदान हळूहळू कमी होत शून्यावर आलं आहे, असं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं. ते आज मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते.

परिवहन विभाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडेच असून, तीस वर्षाचा तोटा त्यांनी एका वर्षात नफ्यात बदलला,असं ते म्हणाले.७५ वर्षे पूर्ण झालेल्या जेष्ठ नागरिकांना एसटी महामंडळाच्या सर्व प्रकारच्या बसेस मधून मोफत प्रवासाची सवलत, आणि महिलांना तिकीट दरांमध्ये ५० टक्के सवलत देण्याच्या निर्णयांमुळे एसटीच्या सवलत मूल्याच्या प्रतिपूर्ती पोटी शासनाला द्यावी लागणारी रक्कम ३०० ते ३५० कोटी एवढी झाली. त्यामुळे राज्यातल्या एसटी महामंडळाच्या ३१ विभागांपैकी १८ विभाग हे नफ्यात आले आहेत,असं सामंत यांनी सांगितलं.

https://youtu.be/GNzisd4JIH4?si=gWjIzhUX0NFwy5O_

महत्वाच्या बातम्या-

‘हमासवर इजरायलचा बॉम्ब पडताच सर्वाधिक वेदना कॉंग्रेसवाल्यांनाच होत आहेत’

‘बॉईज ४’ मधील ‘ये ना राणी’वर थिरकणार महाराष्ट्र

2024 साली हिंदुत्वाचे पुरस्कर्ते नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार