Rajya Sabha Election | राज्यसभा निवडणुकीत विरोधकांना भाजप कोंडीत पकडणार; भाजपच्या रणनीतीपुढे कॉंग्रेस हतबल

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणूक 2024 मध्ये एक रंजक स्पर्धा पाहायला मिळू शकते. भारतीय जनता पक्षाने (BJP) अनेक राज्यांत जास्त उमेदवार उभे करून विरोधकांसाठी ही लढत अवघड बनवली आहे. अतिरिक्त उमेदवार रिंगणात उतरवल्यामुळे राज्यांमधील स्पर्धा रंजक बनली आहे. भाजपच्या या खेळीमुळे यूपीमध्ये सपाची एक जागा आणि हिमाचलमध्ये काँग्रेसचे अभिषेक मनू सिंघवी (Abhishek Manu Singhvi) यांची जागा अडकण्याची शक्यता आहे.

हिमाचल प्रदेशात काँग्रेसची संख्यात्मक ताकद आहे. 68 सदस्यीय विधानसभेत काँग्रेसचे 40 तर भाजपचे 25 आमदार आहेत. काँग्रेसला येथे विजयासाठी 34 आमदारांची गरज आहे, परंतु पक्षातील असंतोषामुळे येथे क्रॉस व्होटिंग होऊ शकते.

प्रदेशमध्ये राज्यसभेच्या 10 जागा (Rajya Sabha Election) आहेत. त्यावर भाजपला 7 तर सपाला तीन जागा मिळत असल्याचे दिसत आहे, मात्र तिसऱ्या उमेदवाराबाबत समाजवादी पक्षात बंडखोरी सुरू झाली असून या संधीचा फायदा घेण्यासाठी भाजपने संजय सेठ यांना येथून आठवे उमेदवार उभे केले आहे. यामुळे UPमध्ये निवडणूक रंजक बनली आहे.

तिकडे काँग्रेसने कर्नाटकमधून अजय माकन, अनिल कुमार यादव आणि नासिर हुसेन यांना उमेदवारी दिली आहे. त्याच वेळी, जेडीएसने माजी राज्यसभा सदस्य डी कुपेंद्र रेड्डी यांना रिंगणात उतरवले आहे, तर भाजपने पाचवे उमेदवार म्हणून नारायणसा बांगडे यांना उभे केले आहे, त्यामुळे काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजत आहे.

महत्वाच्या बातम्या

Nitesh Rane | पहिल्या दिवसापासून जरागेंना सांगतोय राजकीय टीका करु नका, भाजप नेते नितेश राणेंचा इशारा

Manoj Jarange Patil यांची तब्येत महत्वाची, त्यांच्या प्रकृतीला काय झाले तर जबाबदार कोण? – पृथ्वीराज चव्हाण

Devendra Fadnavis | “मला अनेकदा वाटतं अमृताच्या तोंडाला चिकटपट्टी लावावी असं वाटतं”, देवेंद्र फडणवीस काय बोलून गेले?