same-sex marriage : समलिंगी विवाहाला मान्यता देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

same-sex marriage समलिंगी विवाहाला कायदेशीर मान्यता देण्यासाठी विशेष विवाह कायद्याचा संकोच करायला सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) आज नकार दिला. यासाठी संसदेनं कायदा करावा असं मत सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड़ (Dhananjay Chandrachud) यांनी नोंदवलं.घटनापीठातल्या न्यायधीशांनी यावर चार निकालपत्रं जाहीर केली.

विशेष विवाह कायद्यातल्या तरतुदी रद्द किंवा दुर्लक्षित करता येणार नाहीत, असं सरन्यायाधीशांनी त्यांच्या निकालपत्रात म्हटलं. मात्र, समलिंगी व्यक्तींच्या हक्कांबाबत निर्णय घेण्यासाठी केंद्रसरकार एक समिती स्थापन करेल, असं सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगितलं होतं, याची नोंद सरन्यायाधीशांनी या निकालपत्रात केली आहे.

पारलिंगी व्यक्ती, भिन्नलिंगी व्यक्तीशी सध्याच्या व्यक्तिगत कायद्यांतर्गत विवाह करु शकते, तसंच अविवाहित समलिंगी जोडपंही मूल दत्तक घेऊ शकतं, असंही त्यांनी म्हटलं आहे. न्यायमूर्ती एस के कौल, न्यायमूर्ती एस रविंद्र भट, न्यायमूर्ती पी. एस नरसिंह यांनी काही बाबतीत वेगळं मत नोंदवलं आहे.मात्र समलिंगी व्यक्तींच्या हक्कांबाबत सहमती व्यक्त केली आहे.

पाच न्यायाधीशांनी यावेळी चार निकालपत्रांमधून आपली सविस्तर भूमिका मांडली. यापैकी सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड व न्यायमूर्ती कौल यांनी समलिंगी विवाहाला मान्यता देण्याच्या बाजूने निकाल दिला. तर न्यायमूर्ती रवींद्र भट, न्यायमूर्ती नरसिंह व न्यायमूर्ती कोहली यांनी मानता देण्याच्या विरोधात निकाल दिला. त्यामुळे ३ विरुद्ध २ अशा मतांनी ही याचिका फेटाळण्यात आली.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा